केंद्र सरकारकडून कारखानदार आणि घाऊक विक्रेत्यांना डाळींच्या साठवणुकीत सवलत
केंद्र सरकारनं कारखानदार आणि घाऊक विक्रेत्यांना डाळींच्या साठवणुकीत सवलत दिली आहे. तसंच, किमती कमी झाल्यानं आणि राज्य सरकारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर डाळ आयातदारांनाही साठवणुकीत सवलत दिली आहे.
साठवणुकीची मर्यादा केवळ तूर, उडीद, चणा आणि मसूर डाळींनाच लागू राहील. अर्थात, या सर्वांना ग्राहक व्यवहार विभागाच्या वेब पोर्टलवर त्यांच्याकडच्या साठयाची माहिती जाहीर करणं बंधनकारक आहे. घाऊक विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा ५०० मॅट्रिक करण्यात आली असून कुठल्याही एका प्रकारच्या डाळीचा साठा २०० मेट्रिक टनपेक्षा जास्त करता येणार नाही. किरकोळ विक्रेत्यांसाठी ही मर्यादा ५ मेट्रिक टन असून कारखानदारांसाठी गेल्या ६ महिन्यातील उत्पादन किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या ५० टक्के राहील. ही सवलत ३१ ऑक्टोबर पर्यंतच लागू असेल.
