केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आवाहन

सुमारे 63 लाख किलोमीटर रस्त्याचे जाळे असणारा भारत हा याबाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असेही गडकरी म्हणाले. रस्ते पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत, कारण 70 टक्के वस्तू आणि सुमारे 90 टक्के प्रवासी वाहतुकीसाठी रस्त्यांचा वापर केला जातो. पंतप्रधानांनी पुढील पाच वर्षांत भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले, सरकार राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइनच्या माध्यमातून पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 1.4 ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच 111 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे. यावर्षी सरकारने पायाभूत सुविधांवरील भांडवली खर्च 34 टक्क्यांनी वाढवून 5.54 लाख कोटी रुपये केला आहे. पायाभूत सुविधांमधील वाढीव गुंतवणूकीमुळे कोविड महामरीच्या काळात रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ते म्हणाले कि दररोज 40 किमी प्रमाणे 60,000 कि.मी. लांबीचे जागतिक दर्जाचे राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
