५१२ कोटी रुपयांच्या कर्नाळा सहकारी बँक घोटाळ्याचा होता आरोप
पनवेल, दि.१५: रायगड जिल्ह्यातील पनवेल स्थित कर्नाळा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांना सक्तवसुली संचालनालय(ईडी) ने रात्री ९ च्या सुमारास पनवेल येथील राहत्या घरून अटक केली. कर्नाळा सहकारी बँकेतील ५१२ कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विवेक पाटील, बँकेचे उपाध्यक्ष, संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याविरोधात पनवेल पोलीस स्थानकात याआधीच गुन्हा नोंदवण्यात आला होता. परंतू त्यांना अटक करण्यात आली नव्हती.
सक्तवसुली संचालनालय मुंबई झोन २ चे सहाय्यक संचालक सुनील कुमार यांनी ही विशेष कारवाई केली. या घोटाळ्याचा सर्वात जास्त फटका हा सामान्य ठेवीदार, ज्येष्ठ नागरिक यांना बसला. विवेक पाटील हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार आहेत.
