मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार रामशेठ ठाकूर इच्छुक असल्याची चर्चा
पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. युतीच्या जागावाटपात हि जागा शिवसेनकडेच आहे. पण जागांची अदलाबदल करून हि जागा भाजपकडे खेचून आणण्यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे कळते. दोन वेळ जुन्या कुलाबा मतदार संघाचे खासदार राहिलेले रामशेठ ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात चांगु काना ठाकूर शिक्षण संस्थेमार्फत मोठं योगदान दिलं आहे. आपल्या दानशूरपणा बद्दल व विनयशील स्वभावासाठी ते चिरपरिचित आहेत. त्यामुळे सर्व पक्षातील कार्यकर्ते ते नेते ह्यांपर्यंत त्यांचा जनसंपर्क मोठा आहे. जिल्ह्यातील राजकारणावरील त्यांची पकड मजबूत असल्यामुळे ते खासदारकी साठी इच्छुक असल्याचे कळते. पण त्यांच्यासमोर शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे तगडे आवाहन राहील. पुढील दोन दिवसात यासंदर्भातील चित्र मोकळं होईल.