Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जोशपूर्ण वातावरणात पार पडली नवी मुंबई ‘ई.टी. मॅरेथॉन २०१९’ स्पर्धा

जोशपूर्ण वातावरणात पार पडली नवी मुंबई ‘ई.टी. मॅरेथॉन २०१९’ स्पर्धा

नवी मुंबई व परिसरातील बहुचर्चित इव्हेंट टाईम्स आयोजित आणि ऍग्रो सखी व ऑर्डीनट्स प्रायव्हेट लिमिटेड प्रायोजित ‘ई.टी. मॅरेथॉन २०१९’ स्पर्धा रविवार दिनांक १० मार्च रोजी ज्वेल ऑफ नवी मुंबई, सीवूड्स येथे जोशपूर्ण वातावरणात संपन्न झाली. १००० पेक्षा जास्त स्पर्धकांनी यात आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेत नामांकित मॅरॅथॉनपटू परीतोश मोहिते यांनी सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. ह्या स्पर्धेत जसा धावपटूंचा जोश ओसंडून वाहत होता तसाच दुतर्फा जमलेल्या गर्दीचाही त्यांना चीअर करतानाचा उत्साह पाहण्यासारखा होता. आयोजकांनी मॅरेथॉन स्पर्धेसाठी सुरक्षित मार्ग, स्पर्धा पूर्ण केलेल्या प्रत्येक धावपटूला पदक, सहभागी स्पर्धकांना स्पर्धेदरम्यान पाणी व प्रोटीनयुक्त पेयाची व्यवस्था यांचे उत्तम प्रकारे नियोजन केले होते. या अशा उत्तम आयोजनामुळे मुंबई व नवी मुंबई परिसरातील एक नामांकित स्पर्धा म्हणून धावपटूंकडून प्रशंसा केली गेली. स्पर्धेच्या सुरुवातीला काश्मीर येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सीआरपीएफ च्या जवांनांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

आम्ही ‘ईव्हेंट टाईम्स’ चे संचालक डॉ. विश्वनाथ गारगोटे यांची मुलाखत घेतली तेव्हा ते म्हणाले कि, “हि स्पर्धा आयोजित करण्यामागे आमचा हेतू काही पैसे कमावणे हा नव्हता आणि तसा तो भविष्यातही नसेल. या मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनातून आलेली रक्कम विदर्भ-मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना देण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी मिळालेला अनपेक्षित प्रतिसाद पाहून आम्ही येत्या २३ जून २०१९ रोजी पावसाळी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. आणि त्याची नोंदणीहि सुरु करण्यात आली आहे.” ते पुढे म्हणाले, “नवी मुंबई पोलीस, वाहतूक विभाग व नवी मुंबई महानगर पालिका यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हि स्पर्धा सुरळीत पार पडली. आम्ही ह्या सर्वांचे आभार मानतो.”

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्वाती पाटोळे, अश्विनी भोसले, सोनाली आणि वल्लभ बोरचाटे व प्राजक्ता गारगोटे यांनी चेयरमन अनिल उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसरात्र कष्ट घेत मोलाचं योगदान दिलं. ‘महाराष्ट्र वार्ता’ या स्पर्धेचे मीडिया पार्टनर होते.

स्पर्धेशी निगडित अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

https://www.eventtimes.in

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *