अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
मुंबई, दि.६: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी देशमुख यांना अटकेपासून हंगामी संरक्षण द्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवला आहे. तो रद्द करावा यासाठी देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
आज त्याची सुनावणी करताना न्यायालयाने त्यावर सीबीआयकडून जाब मागितला आणि सुनावणी उन्हाळी सुट्टी संपेपर्यंत तहकूब केली. हंगामी संरक्षणाचा आदेश द्यायला न्यायालयानं नकार दिला. मात्र अगदीच तातडी असेल तर त्यासाठी देशमुख सुट्टीकालीन पीठाकडे जाऊ शकतात, असे न्यायालयाने सांगितले.
Source – AIR
