केंद्र सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत जाहीर
विरार, दि.२३: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आग दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ही घटना दुःखद असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं असून या घटनेत मरण पावलेल्यांबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या वारसांना पंतप्रधान आपत्कालीन निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये तर गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
