अल्पबचत योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून मागे
नवी दिल्ली: केंद्र सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. व्याजदरांत कपात करण्यात आल्याचा काल जाहिर करण्यात आलेला आदेश मागे घेत असल्याची माहिती केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सकाळी ट्विटर संदेशांत दिली. 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या अंतिम तिमाहीत बचत योजनांवर जे व्याजदर होते तेच अबाधित ठेवण्यात आले आहेत. अल्पबचत योजनांवरील व्याजदर वाढीचा निर्णय घोषित झाल्यावर देशभरातून केंद्रावर टीका करण्यात येत होती. कोविड च्या पार्श्वभूमीवर असा आदेश येणे जनतेला अपेक्षित नव्हते.
