अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका
उद्या सुरु होणाऱ्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. अवैध वाळूची चोरी, पोलीसांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय, कोविड परिस्थितीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत, त्या भ्रष्टाचाराची पुस्तिका आम्ही मांडणार आहोत, असे फडणवीस म्हणाले.
महिलांवर अत्याचार वाढले आहेत, इतके ढळढळीत पुरावे असतानाही संजय राठोड यांच्यावर पोलीस कारवाई करत नसतील तर वरिष्ठांचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही, असा आरोप त्यांनी केला. शक्ति कायदा हा एक फार्स आहे. जर मंत्री राठोड राजीनामा देत नसतील तर या कायद्याच्या समितीत असलेले भाजपाचे आम्ही सर्व सदस्य राजीनामे देतोय, असं त्यांनी सांगितले. लोकांमध्ये वीजबीलांमुळे असंतोष असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
