पोलिओ डोसऐवजी सॅनिटायझरचा डोस दिल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातल्या कोपरी इथे बालकांना पोलिओ लसीऐवजी सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम आणि वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचा प्रस्ताव चौकशी समितीने दिला आहे.
त्याचबरोबर सीएचओ अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम याचेवर सेवा समाप्तीची कारवाई, तर अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
परवा पोलिओ लसीकरणाच्या दिवशी १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आले असून, या बालकांवर यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र वार्ता ने ही गेल्या महिन्यात पनवेल महानगरपालिका हद्दीतील खारघर नागरी आरोग्य केंद्रावरील आरोग्य सेवकांनी केलेल्या अशाच एका गोंधळाबाबत वृत्त प्रकाशित केले होते. या ठिकाणी जितेंदर शुक्ला नामक एका कोविड पोसिटीव्ह रुग्णाला श्वानदंशाचे इंजेक्शन देण्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणी महाराष्ट्र वार्ता ने राज्याच्या आरोग्य संचालकांचे लक्ष या विषयाकडे वेधले होते.
