‘सीबीएसई’ मंडळाच्य़ा दहावी आणि बारावीच्या परिक्षा ४ मे ते १० जून दरम्यान
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्य़ा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या ४ मे पासून घेण्यात येतील असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केलं.
या परीक्षा ४ मे ते १० जून या दरम्यान होतील, आणि परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर केले जातील, असं त्यांनी सांगितलं.
बारावी इयत्तेच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरु होणार आहेत.
