देशात सुरु असलेल्या विकासाचा लाभ कोणत्याही पक्षपाताविना प्रत्येक नागरिकाला मिळावा या दिशेने देशाची वाटचाल सुरु – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
देशात गेली सत्तर वर्षे मुस्लीम मुलींचं शाळेतून होणाऱ्या गळतीचं प्रमाण सत्तर टक्के होतं. सरकारने स्वच्छ भारत मिशन सुरु केलं. खेड्यांमधे तसंच शाळेत जाणाऱ्या मुलींसाठी शौचालयं बांधली. आता हे गळतीचं प्रमाण सुमारे ३० टक्क्यावर आलंय, असं ते म्हणाले. अलिकडेच मुस्लीम विद्यापिठाचा शैक्षणिक इतिहास हा भारताचा मौल्यवान वारसा असून इतर देशांशी भारताचे संबंध मजबूत करण्यासाठी या विद्यापिठानं काम केलं आहे.
या विद्यापिठाने कोरोना संकटाच्या काळात समाजाला मोठ्या प्रमाणात मदत केली. हजारो लोकांच्या मोफत चाचण्या केल्या, विलगीकरण कक्ष उभारले, प्लाझ्मा बँका सुरु केल्या आणि पीएम केअर फंडाला मोठ्या रकमेचं योगदान दिलं. समाजाबाबत आपली बांधिलकी पार पाडण्याविषयी अलिगढ मुस्लीम विद्यापीठ किती गंभीर आहे, हेच यातून दिसतं असं मोदी म्हणाले. अलिगढ मुस्लीम विद्यापिठाच्या शताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून एक टपाल तिकिट यावेळी प्रधानमंत्र्यांनी प्रकाशित केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंकही या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.
