नांदेड-पनवेल-नांदेड या हॉलिडे स्पेशल गाडीला ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड-पनवेल-नांदेड या उत्सव विशेष गाडीला ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे ने ही विशेष गाडी सुरू केली होती. परंतू प्रवाशांच्या वाढत्या प्रतिसादाच्या व त्यायोगे मागणीच्या अनुषंगाने या हॉलिडे स्पेशल गाडीला ३० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.
