मी भारतीय असल्याचा गर्व आहे – विंग कमांडर अभिनंदन
भारत माता की जय, मला मी भारतीय असल्याचा गर्व आहे, असे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांनी म्हटलं आहे. अभिनंदन यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्व भारतीयांचे आभार मानले आहेत.
भारत माता की जय, या घोषणेसह भारताच्या तिरंग्याचा फोटो देखील अभिनंदन यांनी ट्विटमध्ये शेअर केला आहे. अभिनंदन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भारतीय हवाई दल, आर्मी आणि नौदल यांना टॅग केलं आहे.
