न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना एक रुपया दंड
नवी दिल्ली, दि.३१: न्यायालय अवमानना प्रकरणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयानं एक रुपया दंड ठोठावला आहे. हा दंड भरायला त्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
ऍड. भूषण यांनी निर्धारित मुदतीत एक रुपया दंड भरला नाही, तर त्यांना वकिली करण्यास तीन वर्षांची बंदी, तसंच तीन महिने कारावास भोगावा लागणार आहे. या निर्णयानंतर ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ऍड. प्रशांत भूषण यांच्यावर नाव न घेता ट्विटर च्या माध्यमातून टीका केली. ते म्हणले की,”एक रुपया मूल्य ठरवलं सर्वोच्च न्यायालयाने या इसमाचं. आणि तेही आपल्या वकीलाकडून घेतलं !! जय हो”
एक रुपया दाम लगाया सुप्रीम कोर्ट ने बंदे का ! और वो भी उसने अपने वक़ील से लिया!!जय हो!! 🙂
— Anupam Kher (@AnupamPKher) August 31, 2020
