भारतीय हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडी वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा
मंगळवारी दिला. राज्यात यवतमाळ मध्ये 6.4 अंश सेल्सिअस इतके सर्वांत कमी तापमान आहे.
पावसाने दोन दिवसांपूर्वी विदर्भात हजेरी लावली होती. त्याचवेळी विदर्भातील अनेक भागाना गारपिटीचा
तडाखाही बसला होता. त्यामुळे विदर्भातील तापमान कमी झाल्याचे हवामन विभागाने सांगितले आहे.
विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रा मध्ये सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात मोठी घट झालेली
आहे. ढगाळ हवामान आणि वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल यामुळे विदर्भ, हरियाणा, राजस्थान, पंजाब,
मध्य प्रदेश या भागात थंडीची तीव्र लाट पसरलेली आहे. त्यामुळे थंडीचा मुक्काम अजून बरेच दिवस लांबेल
असे म्हणायला हरकत नाही.