Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बॉक्स ऑफिसवर मणिकर्णिका आणि ठाकरे ची जादू

Manikarnika-&-Thackarey

बॉक्स ऑफिसवर दोन धमाकेदार चित्रपट वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित झाले. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनावर आधारित ‘ठाकरे’ आणि झांशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जीवनप्रवास सांगणारा ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ हे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले.

पहिल्याच दिवशी ‘मणिकर्णिका’ ने ‘ठाकरे’वर मात करत बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. ‘मणिकर्णिका’च्या कमाईचा आलेख पहिल्याच दिवसापासून वाढत दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘ठाकरे’ सिनेमा देखील बऱ्यापैकी कमाई करताना दिसत आहे. बॉक्स ऑफिसवर ३ हजार स्क्रीनवर ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाला. तर २ हजारपेक्षा अधिक स्क्रीनवर ‘ठाकरे’ दाखविण्यात आला. चित्रपटांच्या कमाईचे आकडे ट्विटरवर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी शेअर केले आहेत. तरण आदर्श यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार ‘मणिकर्णिका’ सिनेमाची आता पर्यंतची कमाई ५२.४० कोटी रुपये इतकी आहे. तर ‘ठाकरे’ सिनेमाची कमाई २६ कोटी रुपये आहे.

‘मणिकर्णिका’ हा सिनेमा तेलगू, हिंदी आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ‘ठाकरे’ हा सिनेमा मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीवर बॉलिवूडची क्वीन कंगणाने मात केली आहे असंच दिसून येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *