SHIVSENA TIGER
शिवसेनेकडून गोव्यातील उमेदवारांची नावे जाहीर
गोव्यात शिवसेना लोकसभेच्या दोन्ही निवडणुका लढवणार असल्याची माहिती शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली. उत्तर गोव्यातून शिवसेना राज्यपम्रुख जितेश कामत तर दक्षिण गोव्यातून उपराज्यप्रमुख राखी प्रभूदेसाई नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने गोवा सुरक्षा मंच सोबत युती केली. मंचकडून म्हापसा, मांद्रे व शिरोडा या तिन्ही पोटनिवडणुकीच्या जागा लढणार असून त्यांनी उमेदवार यापूर्वीच जाहीर केले आहेत. मांद्रेतील पोट निवडणूक शिवसेना लढवण्यास इच्छुक आहे. मात्र त्याआधी यासंदर्भात गोवा सुरक्षा मंच सोबत शिवसेना चर्चा करणार असल्याचेही खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
यावेळी खासदार संजय राऊत यांच्यासह राज्यप्रमुख जितेश कामत, उपराज्यप्रमुख राखी प्रभूदेसाई नाईक, संपर्क प्रमुख जीवन कामत व मिलींद गावस उपस्थित होते.
