पहा वाळू शिल्पकार सुदर्शन यांनी कशा प्रकारे न्यूझीलँड मशिद गोळीबारातील मृतात्म्यांना वाहिली श्रद्धांजली
काल न्यूझीलँड येथील मशिदीवर एका माथेफिरूने गोळीबार केला त्यात ४९ निष्पाप नागरिकांचा मृत्य झाला. जगभरातून ह्या हल्ल्याचा निषेध व मृतांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक यांनीही पुरी येथे आपल्या अनोख्या वाळू शिल्पाद्वारे ह्या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच बरोबर ‘एक जग, एक नारा….दहशतवाद संपवा’ असे लिहून त्यांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे.