Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस ‘कोकण रेल्वेचे निर्माता’”

George Fernandes 1

कामगार चळवळीचे पितामह तसेच देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज सकाळी दिल्लीत
एम्स निधन झाले. दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर पंतप्रधान
नरेंद्र मोदी याच सोबत अनेक राजकीय नेत्यांनी ट्विटवरुन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘कोकण रेल्वेचे निर्माता’ असं म्हटत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी फर्नांडिस यांना श्रद्धांजली अर्पण केली.
१९८९ ते १९९० या काळात जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वे मंत्री होते. त्याच काळात कोकण रेल्वे झालीच
पाहिजे हे त्यांचं ठाम मत होतं आणि त्यांच्या याच निर्णयामुळ कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली.
अनेक मंत्र्यानी त्यांच्या कोकण रेल्वे निर्मिती च्या निर्णयाला विरोध केला होता. कोणत्याही विरोधाला न
जुमानता फर्नांडिस यांनी कोकण रेल्वे प्रकल्प एकहाती पूर्ण केला. त्याच सोबत कोकण रेल्वे महामंडळाची
फर्नांडिस यांनी स्थापना केली. कोकण रेल्वे प्रकल्पाचे काम थेट रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत होते. त्यामुळे
प्रकल्पाला वेग आला. फर्नांडिस यांच्या ठाम निर्णयामुळे कोकण रेल्वे अवघ्या दहा वर्षात या
मार्गावरुन धावू लागली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *