Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राहुल गांधी यांनी घेतली मनोहर पर्रिकर यांची घेतली सदिच्छा भेट

Rahul-n-Parrikar-Web

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गोवा विधानभवनात
आज भेट घेतली. गोवा विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झाले असुन
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गंभीर आजारी असूनही या अधिवेशनाला उपस्थित राहिले.
विधानसभेचे कामकाज संपताच राहुल गांधी यांनी मनोहर पर्रिकर यांच्या तब्येतीची चौकशी केली.
त्याचवेळी लवकर बरे व्हा, अशी सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. ट्विट करून त्यांनी हि
माहिती दिली.

मध्यंतरी राहुल गांधींनी पर्रिकर यांच्या विषयी बोलताना म्हटले होते कि आरोग्यमंत्री
विश्वजीत राणे आणि एका पत्रकारामध्ये संवाद झाला होता. यामध्ये पत्रकाराला विश्वजीत राणे
सांगत आहेत की, आपल्या निवासस्थानी राफेलप्रकरणाची एक फाईल असल्याचे
पर्रिकरांनी कॅबिनेटला सांगितले आहे. माध्यमांसमोर ही टेप आल्यानंतर विश्वजीत राणे
यांनी यावर बोलण्यास नकार दिला. ही ऑडिओ टेप बनावट असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच या प्रकरणीची चौकशी व्हावी अशी मागणीहि राणेंनी केली होती.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *