भाजपाने तिकीट दिल्यास माढातून लढण्यास तयार : विजयसिंह मोहिते पाटील
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपाने उमेदवारी दिल्यास मी लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी केले आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पुत्राच्या पाठोपाठ आता विजयसिंह मोहिते पाटील ही लवकरच भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादीने सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. भाजप देखील विजयसिंह मोहितेंना तिकीट देऊन राष्ट्रवादीला माढा मध्ये शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोललं जातंय.
संजय शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबीयात पूर्वीपासूनच राजकीय वैमनस्य आहे. त्यामुळे माढ्यातील लढत अजूनच रंजक होणार आहे.
