Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होतील; संजय काकडे

सुप्रिया सुळे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होतील : संजय काकडे

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंचा एक लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव होईल, अशी भविष्यवाणी शिवसेना-भाजप महायुतीचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रचारप्रमुख संजय काकडे यांनी केली आहे.

पुणे येथे गिरीश बापट यांच्या निवासस्थानी संजय काकडे यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर काकडे प्रसार माध्यमांशी बोलत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपाच्या अधिक जागा निवडून येतील, असं काकडे म्हणाले.

बारामती लोकसभा मतदार संघातही भाजपाच्या उमेदवारासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे कांचन ताईंचा विजय होणार, असे भाकीत देखील संजय काकडे यांनी यावेळी केले.

पुणे महापालिकेत भाजपाचीच सत्तेत येणार असल्याची काकड्यांची भविष्यवाणी खरी ठरली होती.आता बारामतीत सुप्रिया सुळें पराभूत होण्याचं भाकित खरं ठरणार का? हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *