Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

भरत जाधव यांचा नवा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला

भरत जाधव यांचा नवा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला

चित्रपट, रंगभूमी किंवा छोटा पडदा या तिन्ही माध्यमांद्वारे आपल्या अभिनयाने भरत जाधव ह्यांनी रसिकांच्या मनात फार मोठे स्थान मिळवलं आहे. वैविध्यपूर्ण भूमिका साकारत भरत यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. काही कारणास्तव भरत जाधव चित्रपटसृष्टी व रंगभूमीपासून अलिप्त होते.

आता पुन्हा भरत जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि ते ही एक नवा कोरा विनोदी सिनेमा घेऊन. ‘स्टेपनी’ असे या चित्रपटाचे नाव असून भरत जाधव या चित्रपटातही विनोदी भूमिका निभावताना दिसणार आहे.

भरत जाधव यांनी यापूर्वीही अनेक चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून विनोदी भूमिका साकारत प्रेक्षकांना पोट धरून हसवले आहे. आता ‘स्टेपनी’ या चित्रपटातून भरत जाधव पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये धमाल उडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची निर्मिती श्री गणराया फिल्म्स आणि अनंत भुवड, नरेंद्र जयस्वाल, भटूलाल जयस्वाल यांनी केली आहे.

स्टेपनी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *