Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धक्कादायक : जेट एअरवेजची सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द

धक्कादायक : जेट एअरवेजची सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे तातडीने रद्द

मुंबई: आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजने आपली सगळी आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केली आहेत. त्यामुळे काल रात्रीपासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

जेट एअरवेज ही विमान कंपनी गेल्या काही दिवसांपासून आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे कंपनीला डीजीसीएने तांत्रिक मुद्द्यांवरुन विमान उड्डाणाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे काल (गुरुवार) रात्रीपासून जेटची आंतरराष्ट्रीय विमान सेवा ठप्प झाली आहे. विमान उड्डाणे रद्द केल्याने जेट एअरवेजला प्रवाशांना ३,५०० कोटी द्यावे लागणार आहेत. काल, कंपनीच्या १४ विमानांची उड्डाणे सुरू होती. याआधी जेट वेअरवेजची १२३ विमाने सेवा देत होती. ही संख्या आता दहाच्या खाली आली आहे.

नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी, जेट एअरवेजच्या समस्येचा आढावा घेण्याचे निर्देश नागरी हवाई उड्डाण सचिवांना दिले आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही प्रभू यांनी ट्वीट करत सूचित केले आहे.

इंधनाची थकीत रक्कम न मिळाल्याने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने जेट एअरवेजचा इंधन पुरवठा बंद केला. जेट एअरवेज गेल्या काही दिवसांपासून आर्थिक दिवाळखोरीचा सामना करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा थकले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *