Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पंतप्रधान नरेंद्र मोदींना सौदी अरेबिया करणार सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

पंतप्रधान नरेंद्र मोदींना यूएई करणार सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त अरब अमिरातचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘झायेद मेडल’ने सन्मानित करण्यात येणार आहे.

यूएई चे राजपुत्र मोहम्मद बिन झायेद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे. राजपुत्र झायेद यांनी म्हटले की,’ भारताबरोबर आमचे ऐतिहासिक आणि व्यापारी संबंध आहेत. हे संबंध आणखी मजबूत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच नरेंद्र मोदींचे कौतुक करत यूएईच्या राष्ट्रपतींनी त्यांना झायेद मेडलने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.’

यूएईने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य निसार अहमद तंत्रेला कालच भारताकडे सोपवले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *