Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

देशातील सैन्याबद्दल असं बोलणं एका मुख्यमंत्र्याला शोभतं का?

देशातील सैन्याबद्दल असं बोलणं एका मुख्यमंत्र्याला शोभत का?

बंगळुरू: कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा वादग्रस्त वक्तव्य असलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महत्वाची बाब म्हणजे, भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडीओत कुमारस्वामी कन्नड भाषेत असं म्हणत आहेत की, ज्यांना खाण्यासाठी काहीही मिळत नाही, असे लोक सैन्यात भर्ती होतात.

या व्हिडीओखाली भाजपने कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुमारस्वामी यांना माहीत असायला हवं की लोक देशप्रेम म्हणून सैन्यात भर्ती होतात. तुम्ही तुमच्या मुलाला लोकसभा निवडणुकीत लढवण्यापेक्षा सैन्यात का नाही पाठवत? जेव्हा तुम्ही असं कराल, तेव्हा तुम्हाला सैनिक म्हणजे काय ते कळेल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडीओमुळे देशभर कुमारस्वामी यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *