Dry Fruits 640x426
झटपट तयार करा सुक्या मेव्याची चटणी
साहित्य : मोठ्या आकाराची चिंच. एक चमचा बेदाणे, दोन चमचे किसलेला गूळ, थोडे काजू, एक चमचा तीळ, अर्धा चमचा भाजलेल्या जिर्याची पूड, एक चमचा भाजून सालं काढलेले दाणे, एक चमचा सुक्या खोबर्याचा कीस अर्धा चमचा तिखट, चवीपुरते मीठ.
कृती : चटणी करण्यापूर्वी चिंच स्वच्छ धुवून एक तास अगोदर भिजत घाला. तिचा कोळ काढून तो गाळून घ्या. तीळ व खोबर्याचा कीस वेगवेळे भाजून घ्या. मिक्सरच्या भांड्यात काजू व दाणे यांची चांगली बारीक पूड करून घ्या. त्यातच तीळ व खोबरे यांचीही पूड करा. कढईत चिंचेचा कोळ घालून त्यात वरील सर्व पुडी, तिखट, मीठ, बेदाणा, गूळ घालून मंद आचेवर चटणीला चमक येईपर्यंत शिजवा. हलवत राहा म्हणजे खाली लागणार नाही. शेवटी जिरेपूड घालून गॅस बंद करा. हि झटपट होणारी सुक्या मेव्याची चटणी तुम्ही काचेच्या सुक्या बरणीत ठेवलीत तर बरेच दिवस टिकते.
