Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हेल्मेट सक्ती विरोधातल्या आंदोलना दरम्यान आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची 

Medha Kulkarni 400

हेल्मेट सक्ती आंदोलनात आमदार मेधा कुलकर्णीं आणि आंदोलनकर्त्यांत बाचाबाची 

१ जानेवारीपासून पुण्यामध्ये वाहतुक पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे. त्याच निषेधार्थ आज पुण्यातील महात्मा फुले मंडई येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाला पुण्याच्या भाजपा आमदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. घंटानाद आंदोलनात सहभागी झालेले आंदोलनकर्ते पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात घोषणा देत होते. यावेळी मेधा कुलकर्णी ह्यानी पालकमंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करु नका असे सांगितले. पालकमंत्री आणि मी आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत असे सांगण्याचा मेधा कुलकर्णी प्रयत्न करत होत्या. त्याचवेळी, आंदोलनकर्त्यांनी तुम्ही आमच्यावर दादागिरी करू नका अशा घोषणा देण्यास सुरुवात केली अणि मेधा कुलकर्णी यांना आंदोलनातून हुसकावून लावले.

महात्मा फुले मंडई चौकात झालेल्या घंटानाद आंदोलनात भाजपा आमदार मेधा कुलकर्णी, हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीचे संयोजक माजी महापौर अंकुश काकडे, नगरसेवक विशाल धनवडे, माजी महापौर शांतीलाल सुरतवाला, संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे, माजी नगरसेविका रूपाली पाटील, माजी नगरसेवक धनंजय जाधव, तसेच शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *