Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जाणून घ्या सेंट्रल रेल्वेवरील मेगा ब्लॉक संदर्भातील माहिती.

Mumbai_Suburban_Railway-Web

जाणून घ्या सेंट्रल रेल्वेवरील मेगा ब्लॉक संदर्भातील माहिती

रविवारी हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरुळ दरम्यान तसेच माटुंगा-मुलूंड स्थानकादरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवारी घेण्यात येणाऱ्या ब्लॉक काळात सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात येणार आहे.

सायन-मुलुंड स्थानकांदरम्यान सर्व लोकल थांबणार असल्याने उद्या ब्लॉक काळात लोकल २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. डाऊन धीम्या मार्गावर सर्व लोकल फेऱ्या वळवण्यात येणार आहेत.

उद्या ब्लॉक काळात वाशी – सीएसएमटी, सीएसएमटी- पनवेल – बेलापूर अप आणि डाऊन अशा सर्व लोकल फेऱ्या बंद राहणार आहेत. सकाळी १० ते दुपारी ४.३० पर्यंत हार्बर मार्गावरील प्रवासी ट्रान्सहार्बर आणि मध्य मार्गाने प्रवास करु शकतात. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मानखुर्द स्थानकांदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *