अप्पर जिल्हाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले गेले
बीड: पुरवठा विभागातील चौकशीच्या अहवालाची पूर्ण माहिती देण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे यांनी दहा लाख रुपयांची मागणी केली होती.
बीड येथील शासकीय निवासस्थानी अप्पर जिल्हाधिकारी बीएम कांबळे यांना आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने औरंगाबाद, बीड, तळेगाव आणि नांदेड येथील बी .एम. कांबळे यांच्या निवासस्थानी छापे टाकले. पुढील माहिती पंचनाम्यानंतर उघड होईल.