अमित शहा आज युतीसंदर्भातील बोलणीसाठी मातोश्रीवर ?
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना- भाजप यांच्यात असलेले अनेक मतभेद दूर होऊन अखेर युती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे आज मुंबईत येणार असून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार घेणार आहेत. या भेटीदरम्यान युतीवर शिक्कामोर्तब होईल आणि युतीची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मात्र गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला होता. राज्यात मोठ्या भावाची भूमिका आम्हाला मिळावी तसेच १९९५ प्रमाणे सत्ता वाटपाचे सूत्र असावे, मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रही भूमिका शिवसेनेने घेतल्याने युती रखडल्याचे सांगण्यात येत होते. अखेर शिवसेनेला राजी करण्यात भाजपाला यश आल्याचे समजते.