सीएसएमटी येथे पादचारी पूल कोसळला
ऐन गर्दीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पादचारी पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने त्यात ५ जणांचा मृत्यू झाला तर २९ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर सीएसएमटीजवळचा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहचले आहे.
