Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली

जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीची सरशी,भाजपानं धुळे जिल्हा परिषद राखली

राज्यातल्या नागपूर, अकोला, वाशिम, धुळे, नंदुरबार आणि पालघर या सहा जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांच्या काल झालेल्या  निवडणुकीची मतमोजणी आज संपली.
धुळे जिल्हा परिषदेच्या सर्व 56 जागांचा निकाल हाती आला असून, सर्वाधिक ३९ जागा जिंकत भाजपानं बहुमत मिळवलं आहे. कॉंग्रेसने ७ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसनं ३, शिवसेनेने ४, तर अपक्ष उमेदवारांनी ३ जागा मिळवल्या आहेत.

धुळे जिल्ह्यातल्या चार पंचायत समितीच्या एकूण ११२ गणांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक ७१ जागा,तर काँग्रेसने सतरा, शिवसेनेनं १० आणि राष्ट्रवादीनं ६ तसेच अपक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. शिरपूर, शिंदखेडा पंचायत समित्यांवरही भाजपानं विजयी बहुमत मिळवलं आहे.

वाशिम जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ जागांचे निकाल हाती आले असून, भाजपा- सात जागा, काँग्रेस- नऊ जागा, जनविकास आघाडी- सहा, वंचित बहुजन आघाडी- आठ, शिवसेना सहा, राष्ट्रवादी- बारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक, तर अपक्षांनी तीन जागा जिंकल्या आहेत.अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व ५३ जागांपैकी भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक बावीस, भाजपानं सात, शिवसेनेनं बारा, काँग्रेसनं चार राष्ट्रवादी काँग्रेसनं चार जागा, तर अपक्षांनी चार जागा जिंकल्या आहेत.नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागांपैकी काँग्रेसनं १३, भाजपानं आठ, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं एक जागा जिंकली आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्व ५६ जागांपैकी काँग्रेसनं आणि भाजपानं प्रत्येकी २३, शिवसेनेनं सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसनं तीन जागा जिंकल्या आहेत. आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी तोरणमाळ गटातून पराभूत झाल्या आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या सर्व ५७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं चौदा, शिवसेनेनं अठरा, काँग्रेसनं एक, भाजपानं बारा, जागा जिंकल्या असून, इतर बारा उमेदवार निवडून आले आहेत.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या अस्मिता कांबळे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे धनंजय सावंत यांची निवड झाली आहे. शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत आणि आमदार ज्ञानराज चौगुले यांनी भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

बुलडाणा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील भाजपच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अध्यक्षपदावर महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या मनिषा पवार यांची तर उपाध्यक्षपदावर शिवसेनेच्या कमल बुधवत यांची बिनविरोध निवड झाली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *