Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कामकाजास प्रारंभ करण्यापूर्वी केला ‘या’ लेकीच्या बापाला फोन

म्हणून सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी कामकाजास प्रारंभ करण्यापूर्वी केला ‘या’ लेकीच्या बापाला फोन

मुंबई: सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) अशोक चव्हाण यांनी आज मंत्रालयातील कार्यालयातून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी त्यांनी पहिला फोन लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पावलाच्या ठशाने वाहनाची पूजा करणाऱ्या कोल्हापुरातील नागेश पाटील या पित्याला लावला आणि त्याच्याशी संवाद साधला.

अशोक चव्हाण यांनी खातेवाटप झाल्यानंतर तातडीने कामकाज सुरू केले होते. कार्यालय व्यवस्थित झाल्यानंतर त्यांनी आज कार्यालयात प्रवेश करून कामकाजास औपचारिक सुरूवात केली. त्यावेळी चव्हाण म्हणाले की, “सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून अविकसित भागाला न्याय देण्याची माझी भूमिका आहे.  मध्यंतरी मी टीव्हीवर बातमी बघितली की, लहान मुलांना पायी नदी ओलांडून शाळेत जावे लागते. अशी तातडीची गरज असेल तिथे प्राधान्याने निधी दिला जाईल. पायाभूत सुविधा उत्तम असल्या पाहिजेत. कमतरता असेल तिथे निश्चित लक्ष देऊ”.

लेकीवर अपार प्रेम करणाऱ्या पित्यास फोन करून कामकाजाची सुरुवात

मंत्री अशोक चव्हाण यांनी कालच श्री. पाटील यांच्या व्हॉट्सअपवर आलेला टिकटॉकचा हा व्हिडीओ ट्विट केला होता. मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नागेश पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी नवीन वाहन खरेदी केले होते. त्या वाहनाची पूजा करताना त्यांनी आपल्या दोन वर्षीय मुलीचे पाय कुंकवात बुडवून लक्ष्मीची पावले म्हणून त्यांची छाप नव्या गाडीच्या बोनेटवर उमटवली होती. लेकीवरील अपार प्रेम व्यक्त करणारा हा व्हिडिओ अशोक चव्हाण यांच्या हृदयाला स्पर्श करून गेला. त्यांनी आपल्या ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करून एक पिता म्हणून आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या. चव्हाण यांनी आज सकाळी कार्यालयात आल्यानंतर पहिला फोन श्री. पाटील यांना केला व त्यांच्या या कृतीचे कौतुक केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *