Mumbai: Account holders queue up outside Yes Bank to withdraw money, in Mumbai, Saturday, March 7, 2020. The central bank on Thursday imposed a moratorium on the capital-starved Yes Bank, capping withdrawals at Rs 50,000 per account and superseded the board of the private sector lender with immediate effect. (PTI Photo)(PTI07-03-2020_000049B)
येस बँकेच्या संस्थापकाला मनी लाँडरिंग प्रकरणी अटक
सक्तवसुली संचालनालयाने येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना मनी लाँडरिंग कायद्याखाली आज सकाळी अटक केली. त्यांची कालपासून १५ तास कसून चौकशी केली गेली.
पुरावे आणि अधिक माहिती गोळा करण्यासाठी काल त्यांच्या तीनही मुलींच्या घरांवर छापे मारून झडती घेण्यात आली. मुंबईत वरळी इथल्या घरावर देखील छापा मारण्यात आला.
डी. एच. एफ एल. या कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कर्ज वितरित केल्याचा आरोप राणावर आहे. गेल्या गुरुवारी रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध आणल्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने या कारवाईला सुरुवात केली. भारतीय स्टेट बँक येस बँकेचे ४९ टक्के समभाग विकत घेणार आहे.
