Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धक्कादायक बातमी: “सामान्य माणूस रस्त्यावरचा कचरा की काय?” ज्याला अशा निकृष्ट दर्जाची औषधं विकली जातात

Featured Video Play Icon

धक्कादायक बातमी: “सामान्य माणूस रस्त्यावरचा कचरा की काय?” ज्याला अशा निकृष्ट दर्जाची औषधं विकली जातात

शनिवारी दि. ७ सायंकाळी जवळपास ६ वाजता टीम महाराष्ट्र वार्ता ने थेट नायर हॉस्पिटल येथील औषधालायावर थेट धाड मारत येथील व्यवस्थापनाकडे निकृष्ट दर्जाच्या औषधांबाबत प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तेथील व्यवस्थापक चंद्रेश गुप्ता व सहकारी यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी शूटिंग करण्याची परवानगी आहे का? असे प्रश्न विचारत उडवाउडवीची उत्तर दिली. जेव्हा आमच्या थेट प्रश्नांची उत्तरं देणं जमत नव्हतं तेव्हा हे सारं आम्ही पैशांसाठी करत असल्याचा खोटा व गंभीर आरोप केला. ज्याची महाराष्ट्र वार्ताने गंभीर दखल घेतली आहे व या बाबत त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात येणार आहे. दोनच दिवसांपूर्वी चंद्रेश गुप्ता व सोबत दोन माणसे आमच्या ऑफिस वरून कपटाने पत्ता घेत आमच्या एका वरिष्ठ प्रतिनिधींच्या घरी खोटं बोलत शिरली होती व त्यांनी या घोटाळ्याबाबत महाराष्ट्र वार्ता कडे एवढी माहिती कुठून आली याबाबत माहिती घेण्यासाठी दबाव टाकण्याचा व अप्रत्यक्षपणे धमकावण्याचा प्रयत्न केला. मुळात या लोकांना आमच्या गुप्तहेरांची माहिती कशाला हवी हा मोठा प्रश्न आम्हाला पडला आहे. ते जर निकृष्ट दर्जाची औषधं विकत नसतील तर त्यांना भीती कसली?

जेव्हा आम्ही धाड टाकली त्याप्रसंगी नेमके पॅनल ऑडिटर कैलाश सिंग व सहा. रमेश गुप्ता नेमके गायब होते हे विशेष. या संदर्भात प्रकाशित झालेली बातमी आम्ही विभागाच्या ड्रग इन्स्पेक्टरना पाठवली असून सदर मेडिकल मधील औषधांचा दर्जा तपासला जाण्याची आम्ही अशा बाळगतो. इथल्या व्यवस्थापकाला आम्ही उपलब्ध कंपन्यांच्या औषधांच्या खरेदीचे पुरावे मागितले तेही त्यांनी देण्यास टाळाटाळ केली. अशी निकृष्ट दर्जाची औषधं खाऊन मूत्रपिंड निकामी होणे, कॅन्सर संबंधी आजार होण्याची दाट शक्यता असते. या औषधांमध्ये मुख्यत्वे व्हिटॅमिन डी 3, कॅल्शिअम, मल्टीव्हिटॅमिन, मधुमेह व इतर औषधांचा समावेश आहे.

गुरुवारी टीम महाराष्ट्र वार्ताने ई वॉर्ड चे सहाय्यक निबंधक सुदाम काठे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. यावेळी आम्हाला त्यांच्याकडून या गंभीर विषयांबाबत समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. अद्याप प्रशासन झोपा काढतंय असंच जाणवतंय. या अशा लोकांना पाठीशी घालून नेमकं प्रशासन काय साधतंय हेच मोठं कोडं आहे. येत्या काही दिवसात आम्ही अजून काही खळबळजनक गोष्टींचा पर्दाफाश करणार आहोत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *