Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हिवाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची सरकारकडे चर्चेची मागणी

हिवाळी अधिवेशनात स्पर्धा परीक्षा घोटाळ्यावरुन विरोधीपक्षांची सरकारकडे चर्चेची मागणी

महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. विधान सभेत दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहिल्यानंतर कार्यवाहीला सुरवात झाली. शुन्य प्रहरात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परिक्षा घोटाळ्यावरून राज्य सरकारवर कडक ताशेरे ओढले. या प्रकरणावर फडणवीस यांनी चर्चेची मागणी केली. या मागणीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला. राज्याच्या जनतेला या घोटाळ्याविषयी माहिती मिळावी म्हणून या घोटाळ्यावर चर्चा होणं गरजेचं आहे, असं पटोले म्हणाले. राज्य सरकारनं अध्यक्ष निवडीबाबत नियमात केलेल्या बद्दलावर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षांबरोबर चर्चा करुन एकमतानं अध्यक्षाची निवड करता आली असती, असंही ते म्हणाले. मुनगंटीवार यांनी या दरम्यान घोडे बाजार हा शब्द वापरला, त्यावर नाना पटोले यांनी आक्षेप घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *