दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क, मतदारांना केले मतदानास बाहेर पडण्याचे आवाहन
सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला देशभर सुरुवात झाली असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
साताऱ्यात उदनयनराजेंनी तर बारामती अजित
पवारांनी कुटुंबासह मतदान केलं.
जालनामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष व उमेदवार रावसाहेब दानवे यांनी कुटुंबियांसह सकाळी ९ वाजता मतदान केले.
जामनेर येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकाळी सहकुटुंब मतदान करत मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
बारामती मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी सकाळी ८ वाजता मतदानाचा हक्क बजावला.
अहमदनगरमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांनी सावेडी उपनगरातील केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी पद्माळे (ता. मिरज) या मूळ गावी मतदान केले.
जळगावमध्ये काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदान सुरू होण्यास उशीर झाला.
पार्थ पवार व सुजय विखे पाटील या दिग्गज नेत्यांच्या मुलांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

