Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नाशिकच्या पोलीस आयुक्त पदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

Vishwas Nangare Patil Fb

नाशिकच्या पोलीस आयुक्त पदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून नाशिकचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मात्र अद्याप तरी राज्याच्या गृहविभागाकडून डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या बदलीचे आदेश प्रसारित करण्यात आलेले नाहीत.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकला पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर औरंगाबाद महानिरीक्षकपदी डॉ. रवींद्र सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली तसेच कोल्हापूर परिक्षेत्र महानिरीक्षकपदी असणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची आतापर्यंतची कारकिर्द –
– लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक
– अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक
– पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– मुंबई पोलीस दल उपायुक्त
– ठाणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक
– अप्पर (अतिरिक्त) पोलीस आयुक्त, मुंबई पश्चिम विभाग
– पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *