Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता पुरस्कार विनोद तावडे यांना जाहीर

Vinod Tawade Award tw

सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता पुरस्कार विनोद तावडे यांना जाहीर

‘सलाम बॉम्बे फाऊंडेशन’ व ‘नरोत्तम सेखसारिया फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ‘सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन व नरोत्तम सेखसारिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे ‘चौथ्या नॅशनल कॉन्फरन्स ऑन टोबॅको ऑर हेल्थ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तेथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना ‘सर्वोत्तम सहाय्यक राजकीय नेता’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा या मोहिमेची सुरुवात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तंबाखूमुक्त शाळा मोहिमेचा प्रचार वेगाने करण्यात आला. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नांमुळे वर्धा, यवतमाळ व नंदुरबार हे तीन जिल्हे तंबाखूमुक्त झाले आहे. २०२२ पर्यंत महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याच्या सलाम बॉम्बेचा प्रयत्न आहे.

राज्यात तंबाखूमुक्त पिढी हवी असेल तर तणावमुक्त शिक्षणाच्या माध्यमातून तणावमुक्त पिढी तयार करावी लागेल, असे आवाहन विनोद तावडे यांनी या कार्यक्रमावेळी उपस्थितांना केले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *