Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना मारहाण

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना विरोधकांनी महापौरांसमोरच बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

जलपर्णी निविदा आठ पट दराने काढल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर मुक्त टिळक यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे केली. महापौर दालनात उपस्थित असलेले अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर हे महापौरांना माहिती देत होते. त्याचवेळी ज्यांनी निविदा काढल्या ते अधिकारी चोर आहेत त्यामुळे त्या अधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणताच खुलासा नको. असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांनी केला.

काँग्रेसचे नगरसेवक रविंद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर देताना अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर म्हणाले, ”हे ऐकून घ्यायला आम्ही येथे आलेलो नाही, तुमची काय लायकी आहे”. असे निंबाळकर यांनी धंगेकर यांना सुनावले. त्याचवेळी आमची लायकी काढणारे तुम्ही कोण, असं म्हणतं महापौर दालनात उपस्थित असलेल्या एका कार्यकर्त्याने निंबाळकर यांच्यावर हात उगारला.

या प्रकारानंतर महापौर मुक्ता टिळक यांच्या दालनात महापालिका आयुक्त, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आणि स्वतः राजेंद्र निंबाळकर यांच्यात बैठक झाली. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी माध्यमांशी संवाद साधत अतिरिक्त आयुक्तांचे विधान योग्य नसून संबधित निविदेची २४ तासात चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेत यापुढे कोणतीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असं मुक्ता टिळक यांनी यावेळी सांगितलं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *