विनोद तावडे व गोपाळ शेट्टी यांची राज ठाकरे यांच्यावर टीका
मुंबई: काल मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पाडाव्या निमित्त आयोजित केलेल्या पक्षाच्या मेळाव्यात मोदींविरोधात केलेल्या टिकेला आज भाजप मधील नेते मंडळींनी अपेक्षेप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “राज ठाकरे यांच्या विषयी ‘फेकू’,’लुक्खा’ असले शब्दप्रयोग करणाऱ्या संजय निरुपम यांच्या काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन काल केले. हा मनसे कार्यकर्त्यांवर अत्याचार आहे.” तसेच ते म्हणाले,” मोदींबद्दल चा राग काढण्यासाठी राहुल गांधींना संधी द्या देश खड्ड्यात तरी घालतील किंवा चालवतील तरी ..खड्यात घालायला ही मनसे आहे का? हा देश आहे …सव्वाशे कोटी लोकांचा देश आहे..”
हाच राग पुढे गोपाळ शेट्टी यांनीही आळवला. एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ते म्हणाले की राज ठाकरेंच्या भाषणामुळे मतदारांची करमणूक होते. राज ठाकरेंना मीडिया मध्ये सतत राहायचे असल्यामुळे त्यांना मोदींवर टीका करावीच लागणार आहे.
एकूणच राज ठाकरेंच्या भाषणानंतर राजकीय अतिषबाजीला सुरुवात झाली आहे. उद्या त्यातून पुढे नेत्यांमधलं ट्विटर वॉर ही सुरू होईल.
