आश्चर्य ! विखे पाटलांच्या नावाचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश
काँग्रेचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय यांनी मोठ्या दिमाखात भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी काँग्रेस पक्षाने विखे पाटील यांच्यावर कोणतीच कारवाई केली नाही, उलट त्यांचा नावाचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
काँग्रेचे नेते मोतीलाल व्होरा यांनी काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची यादी काही वेळापूर्वी प्रसिद्ध केली आहे. या यादीत राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाचा उल्लेख असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँगेसमधील अनेक नेत्यांनी त्यांना विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा देण्यास सांगितला होता. यानंतर काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विखे पाटलांवर कारवाई करतील असे चित्र निर्माण झाले होते. मात्र त्या उलट स्थिती निर्माण होत काँगेसने त्यांचावर स्टार प्रचारकाची जबाबरादी सोपवण्यात आली आहे.
मुलाच्या विरोधात काँग्रेस नेत्यांनी प्रचाराला बोलावल्यास राधाकृष्ण विखे पाटील काय भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे.
