Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाहा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे…

पाहा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची नावे…

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आप आपल्या स्टार प्रचारकांची नावे घोषित करायला सुरुवात केली आहे. त्यातच मंगळवारी (२६ मार्च) काँग्रेसने आपल्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह या नावांसह मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील यांसह अनके प्रमुख नेत्यांचा स्टार प्रचारकांमध्ये सहभाग आहे.

भारत संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन, अभिनेत्री नगमा हे देखील काँग्रेसच्या वतीने स्टार प्रचारक म्हणून निवडणुकीच्या काळात काम पाहणार आहेत.

मोतीलाल व्होरा यांनी आज काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *