विजय शिवतारें ना कार्यकर्तेच योग्य उत्तर देतील – पार्थ पवार
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपाचे डाव दिवसेंदिवस अधिकच रंजक होत आहे.
शिवसेना नेते तथा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी मावळ मधील शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार सभेत बोलताना पार्थ पवारांवर जोरदार टीका केली होती.
शिवतारे म्हणाले होते, काल-परवापर्यंत मुंबई, पुणे आणि गोव्यात पबमध्ये नाचणारा तरुण आता रथयात्रेत नाचू लागतो. काय जादू आहे या लोकशाहीची विदेशी गाड्यात फिरणारा तरुण ट्रेनमध्ये बसत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतात जात आहे.
विजय शिवतारेंच्या टीकेवर राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी अतिशय शांतपणे व संयमाने उत्तर दिलंय. मी त्यांच्या टीकेवर काहीही बोलणार नाही. त्यांना हवं ते बोलू द्या. आता कार्यकर्तेच त्यांना उत्तर देतील, असं पार्थ पवार म्हणाले. पिंपरी-चिंचवड येथील कामगार मेळाव्यात पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नगरसेवक उपस्थित होते.
दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीची लढत निवडणूकच्या तोंडावर अधिक मजेशीर बनत चालली आहे.
