प्रा. रोहिणी गोडबोले, डॉ. अजय सूद, डॉ. माधव गाडगीळ व महताब बामजी यांना मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. १९: मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर पुरस्कारासाठी प्राध्यापिका रोहिणी गोडबोले आणि डॉक्टर अजय सूद यांची, तर डॉक्टर कमला सोहोनी पुरस्कारासाठी डॉक्टर माधव गाडगीळ आणि डॉक्टर महताब बामजी यांची निवड करण्यात आली आहे. नांदेड येथे १६ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत भरणाऱ्या ५९व्या वार्षिक अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
Source – AIR
