Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मिशन चांद्रयान-३ यशस्वी! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लॅंडींग

मिशन चांद्रयान-३ यशस्वी! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यानाचे यशस्वी लॅंडींग

चांद्रयान-३ ला यशस्वीरित्या आणि अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात भारताला आज यश आलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातला पहिला देश ठरला आहे. संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास चांद्रयान-३ चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलं आणि देशभरात एकच जल्लोष झाला. कोट्यावधी लोकांनी युट्युब, टीव्ही आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. गेल्या महिन्यात १४ तारखेला चांद्रयानानं भारतातून उड्डाण केलं होतं. ४० दिवस, ३ तास आणि २९ मिनिटांचा प्रवास करुन चांद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचलं. हे यान चंद्रावर उतरल्यावर विक्रम लँडरचे सौर पॅनल उघडले आणि प्रज्ञान हे रोव्हर चंद्रावर उतरलं. चंद्रावर आगामी १४ दिवस सुर्य किरणे उपलब्ध असतील. त्या काळात सूर्याच्या उष्णतेपासून ऊर्जा घेऊन लँडर आणि रोव्हर चंद्रावरच वातावरण, उष्णता, रासायनिक गुणधर्म, पृष्ठभागाची स्थिरता, चंद्रावरची जमीन याची माहिती विक्रम लँडर चंद्रयान-२ कडे पाठवेल. चंद्रयान-२ ही माहिती इस्रोच्या बेंगळुरुमधल्या केंद्राला पाठवेल.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *