Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

Video: ‘सेक्रेड गेम्स – 2’ चा पहिला टिझर प्रदर्शित

Featured Video Play Icon

Video: ‘सेक्रेड गेम्स – 2’ चा पहिला टिझर प्रदर्शित

नेटफ्लिक्स (Netflix) ची भारतात सर्वात गाजलेली वेब सिरीज ‘सेक्रेड गेम्स’ चा दुसरा सीझन ‘सेक्रेड गेम्स २’ चा टिझर आज प्रदर्शित झाला आहे. पण यात वेब सिरीज कधी प्रदर्शित होईल याचा कुठेच उल्लेख नाही. या टीझर मुळे या सिरीज वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची उत्कंठा मात्र शिगेला पोहोचली आहे. अंदाज आहे की दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांसमोर येईल.

या टिझर मध्ये आपल्याला सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, पंकज त्रिपाठी या पहिल्या सिझन च्या कलाकारांसोबत कल्की कोचलीन व रणवीर शौरी हे नवीन मेम्बर यात ऍड झालेले दिसत आहेत. पहिल्या सिझन चं दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाणी यांनी मिळून केलं होतं. पण दुसरा सिझन अनुराग कश्यप व नीरज घेवानी यांनी दिग्दर्शित केला आहे. पहिल्या सिझन ने फुल्ल टु धुमाकूळ घातला होता. या सिझन मध्ये काय काय दाखवलं जाणार आहे याबाबत फॅन्स मध्ये फारच उत्सुकता आहे.

 

अधिक बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेज ला LIKE करा  

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *