Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘हा’ लघुग्रह पृथ्वीवर पुढच्या ८ वर्षात कोसळू शकतो

‘हा’ लघुग्रह पृथ्वीवर पुढच्या ८ वर्षात कोसळू शकतो

साधारण साडेसहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोसळलेल्या लघुग्रहामुळे इथे राहणारे विशालकाय डायनासोर्स चा अंत झाला होता. ही घटना दुर्मिळ होती. लघुग्रह वैज्ञानिकांसाठी सदैव कुतूहल निर्माण करणारा विषय राहिला आहे. याच कारणास्तव काही दिवसांपूर्वी आयोजित एका संमेलनात जेव्हा सांगितलं की पृथ्वीवर एक महाकाय लघुग्रह आदळणार आहे तेव्हा साऱ्या सभागृहात शांतता पसरली. प्रत्येक जण याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी इच्छुक होता की हे काय आहे आणि असं केव्हा होऊ शकतं. लघुग्रहाबाबत माहिती देणाऱ्या संशोधकांचं असं म्हणणं होतं की लघुग्रह हा पृथ्वीच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहे. याचे नाव “2019-PDC” आहे जो पुढच्या आठ वर्षात पृथ्वीवर आदळू शकतो.

त्याचवेळी नासा(NASA) च्या ‘सेंटर फॉर नियर अर्थ ऑब्जेक्ट स्टडिज’ चे व्यवस्थापक पॉल चडस यांचं म्हणणं म्हणणं होतं की हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता तशी १० टक्केच आहे. पण जर हा पृथ्वीवर कोसळला तर एक अख्ख शहर नष्ट करू शकतो. इतकंच नाही तर हा एका शहरापासून ते एका खंडाच्या मोठ्या भागाचा पूर्णपणे विनाश करू शकतो. या संमेलनात वैज्ञानिकांचे चिंता करण्याचे अजून एक कारण हे ही होते, की हा लघुग्रह पृथ्वीवर कुठे धडकेल याबाबत कसलीही स्पष्टता नव्हती. परंतु इतकं नक्की आहे की आफ्रिका पासून अमेरिका पर्यंत कुठेही हा कोसळू शकतो. त्यामुळे आता सर्वांचे धाबे दणाणले आहेत. पुढच्या आठ वर्षात तो केव्हाही धडकू शकतो. (क्रमशः)

 

अधिक बातम्यांसाठी आमच्या फेसबुक पेज ला LIKE करा

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *